Wednesday, 31 July 2013

तुझं ते हसणं - "आठवणींचे शिंपले "

तुझं ते हसणं  :)

( त्याला तिचं हसणं नेहमीच आवडायच … मग काय ? तिथेच एका कवितेचा जन्म झाला तो असा …)

पावसात कोवळसं ऊन पडल्यावर 
इंद्रधनू पाहतो खुपदा मी … 
तु हसलीस की ते इंद्रधनू 
ग्रीष्मातही अनुभवतो मी … ।।१।।

हसताना तु …. 
गालावर पडते हल्कीसी खळ ,
जणू काही ती … देऊन जाते मला ,
हसत जगण्याचे आगळं - वेगळं बळ … ।।२।।

हसत रहा तु अशीच निरागसपणे … 
जपून ठेव हे निसर्गाचे अप्रतिम देणे …!
खरं सांगू … तुझं ते हसणं  :) 
आणि … 
हसताना अधिकच सुंदर दिसणं …… 
खरचं … वेड लावतं मला …!
खरचं … वेड लावतं मला …!! ।।३।।

…बीआनंद 
("आठवणींचे शिंपले ")











Tuesday, 30 July 2013

"आठवणींचे शिंपले "- आठवते आजुनी मला ….!!!

आठवते  आजुनी मला ….!!!

( त्याच आणि तीच जीवापाड प्रेम असत … पण दोघे ल ग्न नाही करू शकत …मग ते एकमेकांना लग्नाआधी  शेवटचे भेटतात …. ती भेट….  त्याला अशाच एका कातरवेळी आठवते…. त्याच्याकडील "आठवणींच्या शिंपल्यातील" हा पहिला अनमोल मोति… तो कागदावर उतरवतो …. अश्याच दर्दी मित्र आणि मैत्रिणींसाठी ……)

आठवते आजुनी मला  , 
त्या दिवशी आपण दोघेच निवांत गप्पा मारत बसलेलो ….
काही दिवसांनी आपण नक्की दुरावणार हे दोघांनाही माहित होत … 

म्हणून तू मला समजून सांगत होतीस …… 
"सुखात रहा….  काळजी घे …!!! 
माझ्या आठवणींना हसून परतव …!!!"

एवढ्या आपुलकीन सांगत होतीस ना तु …
नाही थांबउ शकलो आसवांना माझ्या … 

क्षणार्धात तू उठलीस…… आसव पुसलीस माझी… 
कीती भाग्यवान मी ……!!!!

ये पण मी नाही हा पुसले तुझे अश्रू …. 
का माहितीये……. 
कारण …. 
तू जास्तच रडशील या भितीन ……।।१।।   
कारण …. 
तू जास्तच रडशील या भितीन ……।।२।।


आपला ,
बीआनंद
"आठवणींचे शिंपले "